गडकरींना कोण भिडणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे. 

नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे. 

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेसाठी भाजपचे तेच उमेदवार राहतील, हे स्पष्ट आहे. त्यांची प्रतिमा व नागपुरात झालेल्या विकास कामांमुळे त्यांना आव्हान देणे कठीण आहे. तरीही काँग्रेसमध्ये निवडणूक लढविण्यासाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल सातजण इच्छुक आहेत. आता या इच्छुकांपैकी कुणाला लॉटरी लागेल? हे सांगणे कठीण असले तरी आपलेच घोडे दामटण्यासाठी आता प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये माजी खासदार व माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार नाना पटोले, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री नितीन राऊत, भाजपचे बंडखोर आमदार आशीष देशमुख व माजी खासदार अविनाश पांडे यांची नावे चर्चेत आहेत.

फेसबुकद्वारे सर्वेक्षणे 
अनेकांनी फेसबुकवर सर्वे सुरू केले आहेत. यात या उमेदवारांपैकी आपण कुणाला उमेदवार म्हणून पसंती देणार? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. एका सर्वेक्षणात नाना पटोले व दुसऱ्या एका सर्वेक्षणात प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या उमेदवारीला पसंती मिळाली. नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनीही गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या निवडणुकीत गडकरींचा सामना करणारे विलास मुत्तेमवार यांना मात्र फारच कमी लोकांनी पसंती दिल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union minister Nitin Gadkari from Nagpur Lok Sabha constituency