
चित्रकलेची अनोखी 'स्ट्रीट गॅलरी'
मांजरखेड : भारतात चौसष्ठ कला आहे.प्रत्येक कलेचं आपलं अनोखं सौन्दर्य स्थान आहे.यामधील चित्रकलेने प्राचीन काळापासून समाजमनावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.अमरावती शहरातील व्ही शरद या आर्टिस्टने प्राचीन काळातील चित्रकला प्रकाराच्या प्रचार व प्रसारासाठी चक्क एक ऑटो खरेदी करून रस्त्यांवर आपल्या कलेची प्रदर्शनी भरवीत आहे. युरोप व अमेरिका खंडातील स्ट्रीट गॅलरी च्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील रहदारीच्या ठिकाणी हा कलाकार हातात रंग,ब्रश व स्पंज च्या सहाय्याने 'नॉन ऑब्जेक्टिव्ह अबस्ट्रॅक्ट'कलेद्वारा लोकांना आकर्षित करत आहे.
कॅमेराचा जन्म झाला नि रिअलिस्टिक पेंटिंगमुळे पारंपरिक ऑब्जेक्टिव्ह व नॉन ऑब्जेक्टिव्ह अबस्ट्रॅक्ट ही कला भारतात कालबाह्य व्हायला लागली. भारतीय प्राचीन कलेमुळे जगात वेगळी ओळख असतांना काही कलाकारांना प्राचीन कला लोप पावत असल्याचे शल्य वाटत आहे.आजच्या पिढीला ही कला कळावी म्हणून अमरावतीतील एका ध्येयवेड्या कलाकाराने चक्क आपली कला एखाद्या बंदिस्त गॅलरीत न भरवता खुल्या आसमंतात भरवायला सुरुवात केली.
याकरिता आपले कलासाहित्य सहज वाहून नेण्यासाठी नवीन ऑटोरिक्षा खरेदी केला.मुंबई,उदयपूर,बडोदा येथील अनुभवाच्या शिदोरीवर हा कलाकार विदर्भात ही कला रुजावी म्हणून कधी अचलपूर,चिखलदरा, सालबर्डी,अकोला अश्या ऐतिहासिक स्थळांवर आपली प्रदर्शनी लावली.आता अमरावती शहरातील रहदारीच्या ठिकाणी कधी महाविद्यालयात, मंदिरात तर कधी रस्त्यांवर स्ट्रीट गॅलरीच्या माध्यमातून आजच्या तरुणांना ह्या कलेचे महत्व पटवून देत आहे.चित्रकलेतील सौन्दर्यानुभूती हा मेंदूचा विषय नसून हृदयाचा विषय असल्याचे कलाप्रेमींना आवर्जून सांगतात.
अनोखी क्रेझ
आजकाल मेट्रो सिटीप्रमाणे छोट्या शहरात सुद्धा कारागिरीची अनोखी क्रेझ निर्माण झाली आहे.नवीन घर खरेदी करण्यापूर्वी वास्तूपेक्षा अश्या पेंटिंग घरात लावण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.पेंटिंग विकत घेणाऱ्यांमध्ये युवक व नवीन घर खरेदी करणारे अधिक ग्राहक असल्याचे आर्टिस्ट व्ही शरद यांनी सांगितले.
रिअल इस्टेटपेक्षा महागड्या पेंटिंग
एखाद्या प्रसिद्ध कलावंतांची एखादी पेंटिंग विकत घ्यायची, ठराविक कालावधी नंतर त्याला दुप्पट तिप्पट किंमत मिळाली की ती विकायची.हा युरोपियन ट्रेंड आता भारतातही रुजल्या जात आहे.रिअल इस्टेट मधील जमीन भावापेक्षा या क्षेत्रातील कला अधिक मौल्यवान असल्याचे कलाशिक्षक उज्वल पंडेकर यांनी सांगितले.
Web Title: Unique Street Gallery Of Painting Street Promotion Artist V Sharad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..