हरभऱ्याची गंजी लावून घरी परतला शेतकरी, सायंकाळी शेतात जाताच सरकली पायाखालची जमीन

unknown person burned gram in farm at digras of yavatmal
unknown person burned gram in farm at digras of yavatmal

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील लोणी येथील शेतकरी साहेबराव राघोजी गावंडे यांच्या शेतात हरभरा कापून मळणीसाठी गंजी लावली होती. मात्र, रविवारी (ता.7) रात्री अज्ञात व्यक्तीने या हरभऱ्याच्या गंजीला आग लावल्याने 50 क्विंटल हरभरा जळून खाक झाला. जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्याचा मुलगा सचिन साहेबराव गावंडे (वय 32) याने पोलिस ठाण्यात दिली. 

तालुक्‍यातील लोणी येथील शेतकरी साहेबराव गावंडे (वय60) यांनी आपल्या 10 एकर शेतापैकी 7 एकरात हरभऱ्याची लागवड केली होती. हरभरा परिपक्व होऊन तो वळल्यानंतर मळणीसाठी सोंगणी करून त्याची गंजी लावून ठेवली होती. रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान साहेबराव गावंडे शेतातून घरी परतले. घरी येताच सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान शेजारील शेतकरी मुकेश सावरकर यांचा फोन आला की तुमच्या शेतात जाळ दिसत आहे. गावंडे लगेच शेतात पोचले असता त्यांना चण्याच्या गंजीला आग लागलेली दिसली. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीवर नियंत्रण न मिळाल्याने सर्व 50 क्विंटल चणा जळून खाक झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत घटनास्थळाचा पंचनामा करून योग्य ती चौकशी करून मला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याचा मुलगा सचिन गावंडे यांनी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com