esakal | अवकाळी पावसाचा फटका, तातडीने सर्वे करण्याचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

savarkar

केंद्रीय राज्यमंत्री व आमदारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अवकाळी पावसाचा फटका, तातडीने सर्वे करण्याचे निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : रब्बीतील पीक घर आणण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर तालुक्यातील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांवर हे संकट कोसळले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी नुगसानग्रस्त भागाची पाहणी करून कृषी अधिकारी मोहन वाघ यांना नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करणे आणि विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये विद्युत खांब पडले. ते तातडीने उभे करण्याचे काम सुरू करीत पर्यायी विद्युत व्यवस्था ग्रामीण भागात करण्यासंदर्भात निर्देश दिले. अकोला, बाळापूर व पातूर तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला. कापशी, चिखलगाव परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. या भागाची पाहणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. हरभरा, गहू, फळबाग व भाजीपाल्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची भेट घेवून तातडीने सर्वे करण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी होते.


या परिसरात केली पाहणी
कापशी, चिखलगाव, वाडेगाव, माझोड, गोरेगाव आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाची पाहणी आमदारांनी केली. यावेळी तहसीलदार लोखंडे, कृषी अधिकारी व महसूल अधिकारी त्यांच्यासमवेत होते. घटनास्थळाचा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात.


कृषी मंत्र्यांची घेणार भेट
विदर्भाच्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व त्यांच्या समस्या कृषिमंत्री दादा भुसे, अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून मांडणार असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.