"वंचित'ची 44 उमेदवारांची यादी घोषित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय निर्माण झाला आहे.

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांना जाहीर झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, आपण वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली नसताही उमेदवारी कशी जाहीर झाली, याबाबत डॉ. लोढा यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. दुसरीकडे डॉ. लोढा यांनी तालुकाध्यक्षांमार्फत उमेदवारी मागितल्याचे वंचितचे रमेश गिरुळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोढा यांनी उमेदवारी मिळण्यासाठी पाठविलेला एसएमएसही आपल्याकडे असल्याचे गिरुळकर यांनी सांगितले.

वंचितने घोषित केलेली विदर्भातील उमेदवारांची नावे अशी -
डॉ. नितीन नांदूरकर (मलकापूर), डॉ. तेजल शरद काळे (बुलडाणा), अशोक सुराडकर (चिखली), सविता शिवाजी मुंडे (सिंदखेडराजा), शरद वस्तकार (खामगाव), शरद बनकर (जळगाव जामोद), धैर्यवान फुंडकर (बाळापूर), इमान पंजानी (अकोला पश्‍चिम), हरिभाऊ भदे (अकोला पूर्व), दिलीप जाधव (रिसोड), डॉ. राम चव्हाण (कारंजा), नीलेश विश्‍वकर्मा (धामणगाव रेल्वे), प्रमोद इंगळे (बडनेरा), आलीम वहीद पटेल (अमरावती), ऍड. दीपक सरदार (तिवसा), रेखा साहेबराव वाकपांजर (दर्यापूर), नंदेश आंबाडकर (अचलपूर), नंदकिशोर कुईटे (मोर्शी), रूपचंद टोपले (आर्वी), सिद्धार्थ डोईफोडे (देवळी), आनंद उमाटे (वर्धा), रुक्षादास बनसोडे (उमरेड), रोशन गांधीराम साव (नागपूर पूर्व), विनय भांगे (नागपूर उत्तर), राजेंद्र काकडे (कामठी), भोजराज बोंडे (रामटेक), विजय शहारे (तुमसर), ऍड्‌. नितीन बोरकर (भंडारा), रिता लांजेवार (अर्जुनी मोरगाव), संदाप पोगामे (तिरोडा), सुभाष रामरामे (आमगाव), रमेश कोरचा (आरमोरी), गोपाळ मगरे (गडचिरोली), गोदारू जुमनाके (राजुरा), तथागत पेटकर (चंद्रपूर), चंदुलाल मसराम (ब्रह्मपुरी), अरविंद सांदेकर (चिमूर), आमोद बावणे (वरोरा), डॉ. महेन्द्र लोढा (वणी), महादेव कोहळे (राळेगाव), योगेश पारवेकर (यवतमाळ), ऍड. समीउल्ला खान (दिग्रस), निरंजन मिश्रा (आर्णी), ज्ञानेश्‍वर बाले (पुसद).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanchit bahujan aaghadi announced 44 candidate list