Vardha : सावंगी रुग्णालयात शिबिरांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vardh

Vardha : सावंगी रुग्णालयात शिबिरांचे आयोजन

वर्धा : सावंगी रुग्णालयाद्वारे गणेशोत्सवानिमित्त आयोजित या शिबिरांमध्ये शनिवार, दि. ११ रोजी न्यूरो सर्जरी विभागात मेंदूच्या दुखापतीचे उपचार, मंगळवार, दि. १४ रोजी शारीरिक असंतुलन, मणक्यांसंबंधीचे आजार, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार, दि. १५ ला लहान मुलांचे मेंदूविकार, मिरगी, हृदयविकाराचा झटका याबाबत तपासणी, दि. १६ रोजी न्यूरोलॉजी विभागात डोकेदुखी, ब्रेन ट्युमर तर इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागात अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या विकाराबाबत तपासणी व उपचार करण्यात येतील.

शुक्रवार, दि. १७ रोजी मिरगी, पाठदुखी, कंबरदुखी, हृदय पुनर्वसन आदींबाबत तपासणी, दि. १८ ला मणक्यांना झालेल्या दुखापतीचे उपचार तर सोमवार, दि. २० ला ब्रेन स्ट्रोक, बालकांचे हृदयविकार याबाबत तपासणी केली जाईल. याशिवाय, दि. १४ ते २० या दरम्यान दररोज हृदयरोग विभागात ऍंजिओग्राफी, पेन क्लिनिकमध्ये विविध वेदनांवर उपचार तर युरोलॉजी विभागात मुतखडा तसेच प्रोस्टेट ग्रंथीबाबत तपासणी करण्यात येईल.

आज सावंगी रुग्णालय सुरू

सावंगी मेघे रुग्णालयाला सोमवारी महालक्ष्मी पूजनानिमित्त सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता रविवार, दि. १२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळत सर्व रुग्णालयीन विभाग सुरू ठेवण्यात आले आहेत.