

Yavatmal
esakal
पुसद (जि. यवतमाळ): वटसावित्रीला व्रत्तवैकल्य जोपासणाऱ्या सुवासिनींनी वडा भोवती दोरा गुंडाळत सात फेऱ्या मारल्या. या फेऱ्यासाठी नवरा- बायकोच्या सोशल मीडियातील ‘रील’ मधून घेतलेल्या फिरक्या वटपौर्णिमेला चांगल्याच गाजल्या. या बेरक्या फिरक्यांनी बायको समोर गुपचूप राहणाऱ्या नवऱ्यांनाही खुदकन हसविले. तर बडबडणाऱ्या बायकांना गुमान चूप केले.