वाहनाला आता सुरक्षा नोंदणी प्लेट

मनीष जामदळ
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

यवतमाळ : विनाक्रमांक वाहन चालविणे, फॅन्सी क्रमांक टाकणे, वाढत्या वाहनचोरीवर आता आळा बसणार आहे. ज्या विक्रेत्याकडून वाहन घेतले जाईल तो विक्रेताच आता (डीलर) उच्चसुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) बसवून देणार आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. 19) उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहनविक्रेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व विक्रेत्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन विभागात दररोज अनेक वाहनांची नोंदणी केली जाते. त्यासाठी वाहनांचा क्रमांकसुद्घा दिला जातो. मात्र, बोगस क्रमांक टाकून वाहन चालविणे, फॅन्सी क्रमांक टाकणे, वाहन तपासणीत अधिकाऱ्यांना येणारी अडचण, वाहनचोरीच्या घटनेत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता, शासनाच्या परिवहन विभागाने सुरक्षा प्लेट बसविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. उच्चसुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेटवर बारकोड बसविण्यात आला आहे. या बारकोडवरून वाहनाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे तपासणी अधिकाऱ्याला सोयीचे होणार आहे. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्‍टर आणि इतर कोणत्याही प्रकारचे वाहन खरेदी केल्यानंतर त्यासाठी ग्राहकाला प्रथम आपल्या आवडीचा क्रमांक मिळवावा लागणार आहे. तो क्रमांक थेट विक्रेत्याला परिवहन विभागाकडूनच पाठविण्यात येणार आहे. हा क्रमांक संबंधित विक्रेत्याकडूनच खरेदी केलेल्या वाहनाच्या उच्चसुरक्षा प्लेटवर टाकण्यात येईल. यानंतर नंबरप्लेट लावलेल्या वाहनाचा फोटो काढून तो उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठविला जाईल व नंतरच सदर वाहनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी होईल, अशी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

बोगस क्रमांक टाकून वाहन चालविणे, दिवसेंदिवस वाहन चोरीत होणारी वाढ लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. क्रमांक टाकण्याचा खर्च वाहन खरेदीतच मिळविण्यात आला आहे. त्यामुळे वाहनावर बाहेरून नंबर टाकणे आता पूर्णपणे बंद झाले आहे.
- राजेंद्र वाढोकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle high security number plate