Gutka Ban : प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले
Khamgaon News : खामगाव येथे राज्य सरकारने बंदी घातलेल्या गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जलंब पोलिसांनी पकडले. ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली.
खामगाव : राज्य शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटख्याची वाहतूक करणारे मालवाहू वाहन जलंब पोलिसांनी नाकाबंदी करून पकडून तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ३८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज १० एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली.