esakal | श्‍वसन विकार विभाग "व्हेंटिलेटर'शिवाय
sakal

बोलून बातमी शोधा

श्‍वसन विकार विभाग "व्हेंटिलेटर'शिवाय

श्‍वसन विकार विभाग "व्हेंटिलेटर'शिवाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : श्‍वसन विकारावर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र असा श्‍वसनरोग विभाग आहे. मात्र एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. श्‍वसन विकारात श्‍वास थांबला की, जिवाची भीती असते, परंतु कृत्रिम श्‍वास देणाऱ्या यंत्रणेपासून राज्यातील महाविद्यालये दूर आहेत.
राज्यात पुण्यासह नागपुरात मेट्रोची कामे सुरू आहेत. तसेच राज्यभरात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्‍वसनाचे विकार वाढत आहेत. फुप्फुसातील श्‍वसननलिकांवर विपरीत परिणाम होतो. न्युमोनियाच्या संसर्गापासून तर इतरही रुग्णांना भरती करतेवेळी श्‍वसनरोग विभागात रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासते. तसेच वंशपंरपरा, ऍलर्जी, धूम्रपान, वायुप्रदूषण, मानसिक ताणतणाव, संसर्ग यामुळे श्‍वसनाचे आजार होतात. वायुप्रदूषण थेट फुप्फुसावर परिणाम करते. याशिवाय सिगारेट किंवा विडीच्या धुरात चार हजार विषारी पदार्थ असतात. त्यात कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन, बेंझपायरीन याचा परिणाम थेट श्‍वसननलिकेवर होतो. फुप्फुसातील वायुकोष व रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन फुप्फुसाची लवचिकता कमी होते. अशा रुग्णांवर या विभागात उपचार होत असूनही राज्यात 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. यातील एकाही वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटर नसल्याचा अफलातून प्रकार पुढे आला आहे. सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील संबंधितांशी संपर्क साधून येथील माहिती गोळा करण्यात आली असता, नागपूर, मुंबई, पुण्यातील श्‍वसनरोग विभागाने केलेली व्हेंटिलेटरची मागणी प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरच्या सुपर स्पेशालिटीमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या प्रयत्नातून स्वतंत्र श्‍वसनविकार विभाग उभारण्यात आला. साठ खाटांच्या या विभागात खाटांच्या दहा टक्के व्हेंटिलेटर असावे, असा निकष सांगतो. यानुसार 6 व्हेंटिलेटर या विभागात असावे. परंतु येथेही एकही व्हेंटिलेटवर नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात विभागप्रमुखांशी संपर्क साधला, परंतु त्यांनी व्हेंटिलेटरची मागणी केल्याचे सांगून इतर माहिती सांगण्यास नकार दिला.
loading image
go to top