व्हेरी हॉरिफिक! जंगलात आढळले मुंडके नसलेले महिलेचे विवस्त्र धड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पुसद तालुक्‍यातील वडदकडून ब्रह्मीकडे जाणाऱ्या मार्गावर भिलवाडी नावाचे जंगल आहे. या जंगलात एक प्राचीन मंदिर आहे. बुधवारी या मंदिराच्या जवळच असलेल्या ओट्यावर अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका महिलेचे विवस्त्र धड रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.

पुसद (जि. यवतमाळ) : वडद ते ब्रह्मी मार्गावरील भिलवाडी जंगलात असलेल्या एका जुन्या मंदिराजवळ मुंडके नसलेले महिलेचे विवस्त्र धड आढळून आले. दृश्‍य पाहताना अंगावर शहारे आणणारी ही घटना बुधवारी (ता.15) सकाळी उघडकीस आली. 

दृश्‍य पाहून पोलिसही शहारले...

पुसद तालुक्‍यातील वडदकडून ब्रह्मीकडे जाणाऱ्या मार्गावर भिलवाडी नावाचे जंगल आहे. या जंगलात एक प्राचीन मंदिर आहे. बुधवारी या मंदिराच्या जवळच असलेल्या ओट्यावर अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका महिलेचे विवस्त्र धड रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. धडापासून मुंडके गायब होते. पुसद ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय चौबे यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा परिसर दिग्रस पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने दिग्रसचे ठाणेदार सोनाजी आमले सुद्धा दाखल झाले. हृदयाचा थरकाप उडविणारे हे दृश्‍य पाहताना पोलिसही काही काळ हबकले. 

अवश्‍य वाचा- नागपुरात घडले "छपाक', "लेबॉरेटरी असिस्टंट'ने विभागप्रमुखावर फेकले हे... 

अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय

धडाजवळ हिरव्या बांगड्या व पूजेचे साहित्य पसरले होते. त्यावरून अघोरी प्रकारातून महिलेचा खून करण्यात आला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे, किंवा अनैतिक संबंधातून हा खून असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. मृत महिलेचे मुंडके शोधण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूचे जंगल पिंजून काढले. परंतु, दुपारपर्यंत त्यांना त्यात यश मिळाले नव्हते. मुंडके गायब, त्यात धडही विवस्त्र असल्याने महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट घेण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी यवतमाळ येथून श्‍वान पथक सुद्धा दाखल झाले आहे. महिलेचे धड शवविच्छेदनासाठी दिग्रस येथे पाठविण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Very horror ..! Woman's headless dead body found in the forest