
यवतमाळ : सुशिक्षील युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आयटीआयमधून तंत्रशुद्घ प्रशिक्षण दिले जाते. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. मात्र, तासिका निदेशकांना मानधन देण्यात आले नाही. लॉकडाउनचे शिकार झाल्याची ओरड करीत आता जगायचे कसे, असा प्रश्न राज्यभरातील तीन हजार निर्देशकांना पडला आहे. शासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांना यश आलेले नाही.
तीन हजार निर्देशक कार्यरत
राज्यात 417 आयटीआयमध्ये जवळपास तीन हजार निर्देशक कार्यरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कार्यरत निर्देशक व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमात तासिका निदेशक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत विद्यार्थ्यांना सुट्ट्या घोषित झाल्यानंतर निदेशकांनी आयटीआयमध्ये येऊ नये, असे प्राचार्यांमार्फत सांगण्यात आल. विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास सुरू ठेवण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले.
रोज दोन तास ऑनलाइन व्याख्याने
प्राध्यापकांनी रोज दोन तास ऑनलाइन व्याख्याने आणि परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या. सूचनांचे पालन करून ऑनलाइन प्रशिक्षणाचे काम अविरतपणे सुरू आहे. मात्र, बहुतांश आयटीआयमधील तासिका निदेशकांचे मानधन अद्यापही मिळालेले नाही. लॉकडाउनच्या आधीच्या काळातील वेतनही अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आले नाही. संस्थाचालक, प्राचार्यांना विचारणा केल्यास शासकीय अनुदान नाही, अशी कारणे दिली जातात. कोरोना संकटकाळात निदेशकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीने जिल्हाप्रशासनाकडे वारंवार पाठपुरावादेखील केला. मात्र, त्यांची मानधनाची मागणी निकाली निघू शकली नाही.
सांगायला शिक्षक असलो तरी स्थिती अतिशय वाईट आहे. अनुदानाचा निधी देण्यास उशीर झाल्यास शिक्षकांमध्ये नैराश्य येण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला. आयटिआय निदेशकांचे मानधन देऊन आर्थिक संकटातून मुक्ती करावी.
- अनिलकुमार होटकर,अध्यक्ष, आयटीआय निदेशक संघर्ष समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.