अमरावती : महागाईमुळे भंगले घराचे स्वप्न; सामान्यांचे बजेट कोलमडले

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत असल्याने ग्रामीण भागात घर बांधकामाला वेग आला आहे.
home
home sakal

मोर्शी (जि. अमरावती) : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत असल्याने ग्रामीण भागात घर बांधकामाला वेग आला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रालासुद्धा चांगले दिवस आले आहेत. परंतु, काही दिवसांपासून बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने घराचे बांधकाम करणे हे आता सर्वसामान्यांच्या हाती राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी ३१० रुपये प्रति बोरी असलेले सिमेंटचे दर आज प्रति बोरी ३८० रुपये झाली आहे. अमरावती शहरात तर सिमेंटचे दर ४०० ते ४२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागील वर्षी ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असलेल्या लोखंडाची किंमत आजघडीला ५ हजार ८०० ते ६ हजारांपर्यंत पोहोचलेली आहे. देशात सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत.

home
कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

जेवणातील तेलापासून ते पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढतच आहेत. डिझेलचे दर वाढल्याने घराला लागणाऱ्या विटा, वाळू, गिट्टी, मुरूम या साहित्याचे दरसुद्धा वाढले आहेत. हिवाळ्यात ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये प्रति हजार असणाऱ्या विटांचे दर सध्या ७ हजारांवर पोहोचले आहे. तर वाळूचे दरसुद्धा प्रति ब्रास १ हजाराच्या जवळपास वाढलेले आहे.

एकंदरीत घर बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्याच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांचे घर बांधण्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या साहित्याच्या वाढत्या किमतीवर बंधने न आल्यास व असेच महागाईचे दर वाढत राहिल्यास नागरिकांचे नवीन घर बांधण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असे दिसून येते.

यावर्षी घर बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे बांधकाम सुरू करतानाचे बजेट बऱ्याच प्रमाणात कोलमडले आहे.

- गजानन हिरुळकर, मोर्शी

home
मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने घर बांधून विक्री करताना अडचणी येत आहेत. घर बांधताना लावलेले पैसेसुद्धा मिळतील की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. साहित्याच्या अशाच किमती वाढत गेल्यास बांधकाम क्षेत्रात शुकशुकाट पसरण्यास वेळ लागणार नाही.

- देव कुरवाडे, बांधकाम व्यवसायी, मोर्शी.

डिझेल दरवाढीने परिणाम

काही दिवसांपासून सिमेंटच्या भावात वाढ झाली आहे. डिझेलच्या दरवाढीचा हा फटका म्हणावा लागेल. सिमेंटच्या दरात वाढ झाल्याने पर्यायाने याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरसुद्धा पडला आहे, असे अमरावतीचे सिमेंट विक्रेते दत्ता गिरी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com