गुरूवार ठरला विदर्भासाठी अपघातवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

याच अपघातात कुणाल मनोज देशभ्रतार (वय 22 रा. वलगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत सगणे हे वाळू व्यावसायिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते एमएच 27 बीयु1705 क्रमांकाच्या दुचाकीने ते गावाहून अमरावतीकडे येत होते. तर, अमरावतीहून जीजे 1 एएल 1753 क्रमांकाच्या दुचाकीने देशभ्रतार व तेलखडे हे दोघे चिंचखेडकडे जात होते. दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली आणि तिघेही दूरवर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

अमरावती-चंद्रपूर : गुरुवारची संध्याकाळ विदर्भात अपघातांची ठरली. गुरुवारच्या संध्याकाळी अमरावती येथील दोघे आणि चंद्रपूर येथील दोघे अपघातात मृत्युमुखी पडले. अमरावती मार्गावरील अपघातातील एक जण गंभीर जखमी असून मरणाशी झुंज देतो आहे.अमरावती ते परतवाडा मार्गावरील वायगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन ठार तर, एक गंभीर जखमी आहे. गुरुवारी (ता. 26) सायंकाळी सवाचारच्या सुमारास ही घटना घडली.

हे वाचाच - तो पच्चावन्न वर्षांचा आणि ती नऊ वर्षांची अन्‌...

अंकुश उद्धव तेलखडे (वय 32 रा. उमरापूर) व रोहित नारायण सगणे (वय 40 रा. निंभारी) अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच अपघातात कुणाल मनोज देशभ्रतार (वय 22 रा. वलगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत सगणे हे वाळू व्यावसायिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते एमएच 27 बीयु1705 क्रमांकाच्या दुचाकीने ते गावाहून अमरावतीकडे येत होते. तर, अमरावतीहून जीजे 1 एएल 1753 क्रमांकाच्या दुचाकीने देशभ्रतार व तेलखडे हे दोघे चिंचखेडकडे जात होते. दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली आणि तिघेही दूरवर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. जखमी बराच वेळेपर्यंत घटनास्थळी पडून होते. एका रुग्णवाहिकेतून तिघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सगणे व तेलखडे यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली.

भंगाराम तळोधीतील दोन युवकांचा तेलंगणात अपघाती मृत्यू

अपघाताची दुसरी घटना तेलंगणातील मंचिरियाल येथे घडली. चंद्रपूर तालुक्‍यातील भंगाराम तळोधी येथील अमोल मल्ला बालुगवार वय (22) व महेश बिरा देवावार यांचा तेलंगणातील मंचिरियाल येथे दि (26) गुरुवार रात्री 8 च्या सुमारास अपघात झाला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान रात्री 11 वाजता दोघांचीही प्राणज्योत मालवली.सविस्तर वृत्त असे की, मृतक अमोल बालुगवार व महेश देवावार हे उपजीविकेसाठी जेसीपी चालवण्याचे काम करतात. जेसीपीमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला दुरुस्त करीत असताना एका कारनी त्यांना जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.अमोल हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्‍च्यात आई, वडील, एक बहीण असून महेश देवावार याच्या पश्‍च्यात आई वडील भाऊ असा परिवार आहे. अमोल व महेशच्या मृत्यूने भंगाराम तळोधी गावात हळहळ व्यक्त होते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha accidentally decided on Thursday