esakal | Vidarbha : प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला लागली आग
sakal

बोलून बातमी शोधा

vardha

Vidarbha : प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला लागली आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडणेर (जि. वर्धा ) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास घडली.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला शॉट सर्किटमुळे आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आहे. या रुग्णवाहिकेचा चालक आराम करीत होता. या वावनात त्याच्या मित्राचा मोबाईल राहिल्याने तो आणण्यासाठी गेला असता त्याला रुग्णवाहिकेला आग लागल्याचे दिसून आले.

आग दिसताच त्याने गाडी मालकाला बोलावले. आगीची घटना स्थानिक नागरिकांना समजताच नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आगीने रुग्णवाहिकेला आपल्या कवेत घेतले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंगणघाट येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. घटनास्थळी वडणेर पोलिसांसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top