Vidarbha Cold Wave :दुपारचेे तापमान वाढले पण हुडहुडी कायम
Cold Wave Persists Across Vidarbha: विदर्भातील किमान तापमानात अंशतः वाढ झाली असली तरी गारठा कायम आहे. नागपूर, गोंदिया आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट जाणवते आहे.
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सतत हेलकावे खात असलेल्या विदर्भातील रात्रीच्या तापमानात सोमवारी अंशतः वाढ झाली. मात्र, हवेत गारठा कायम असल्याने थंडीच्या लाटेपासून नागपूरकरांना दिलासा मिळू शकला नाही.