

Fatal road accidents reported in Buldhana, Gadchiroli, Wardha and Amravati districts during Diwali.
esakal
नागपूर : दिवाळीच्या उत्साहात विदर्भातील चार जिल्ह्यांत झालेल्या भीषण अपघातांनी आनंदावर विरजण पडले. बुलडाणा, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत घडलेल्या दुर्घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. सिंदखेड राजा तालुक्यात भुसा भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन दोघांचा, आष्टी येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघांचा, वर्धा जिल्ह्यात ट्रेलरच्या कटमुळे दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-दर्यापूर मार्गावरील कोकर्डा फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.