Vidarbha: विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर; चार दिवस यलो अलर्ट

Severe Heatwave Grips Vidarbha Region: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर वाढला असून अकोला आणि वर्ध्यात तापमान ४६ अंशांवर पोहोचले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

नागपूर : उन्हाचे सर्वाधिक चटके देणारा नवतपा अजून आठ दिवसांवर असला तरी सध्याही सूर्याचा प्रकोप चांगलाच जाणवत आहे. विदर्भात रविवारीही उष्णतेचा भडका होता. अकोला व वर्ध्याचे कमाल तापमान पुन्हा ४६ अंशांवर गेले, तर उपराजधानीच्या पाऱ्यानेही जोरदार उसळी घेतली.

परभणीत आज ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून एरव्ही दुपारच्या वेळी असणारी वर्दळ दिसेनाशी झाली आहे. उन्हाच्या या तडाख्यापुढे पंखे व कुलरही प्रभावहीन ठरत आहेत. रात्रीही गरमी व उकाडा जाणवत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com