Vidarbha 18 Days Above 40°C in April
esakal
नागपूर : एप्रिल महिन्यात नागपूर व विदर्भातील कमाल तापमान फारफार तर चाळिशीपर्यंत जाते. मात्र यंदाच्या एप्रिलने रेकॉर्डब्रेक केला. या महिन्यात तब्बल १८ दिवस नागपूरचा पारा चाळिशीपार राहिला. गेल्या दहा वर्षांत नागपूरकरांना प्रथमच इतका उष्ण व तापदायक एप्रिल महिना अनुभवायला मिळाला.