Red Alert Continues in vidarbha
esakal
नागपूर : विदर्भातील उन्हाच्या लाटेचा तडाखा दिवसागणिक वाढतच असून, ब्रह्मपुरीसह वर्ध्याचाही पारा आता ४७ अंशांवर पोहोचला आहे. तर उपराजधानीच्या कमाल तापमानात सलग तिसऱ्या दिवशी किंचित घसरण झाली. विदर्भात जवळपास आठ दिवसांपासून भीषण उष्णलाट सुरू आहे. बुलडाणा व भंडारा वगळता सर्वच शहरांमध्ये उन्हाचा कहर दिसून येत आहे.