
नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये अनेक नेते होते. यात विदर्भातील सात आमदारांनी बाजी मारली असून रविवारी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात सात जणांनी शपथ घेतली. यात भाजपच्या चार मंत्र्यांचा समावेश आहे. तर शिंदे सेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांचा समावेश आहे. चार कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री विदर्भाला मिळाले असून पूर्व विदर्भाला तीन तर पश्चिम विदर्भाला चार मंत्री मिळाले आहेत.