

Vidarbha
esakal
वणी: सासरच्या मंडळींकडून बहिणीवर होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचा सूड उगवण्यासाठी एका भावाने आपल्या साथीदारांसह थेट बहिणीच्या सासरी धडक देत जावयावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी(ता. 28) मध्यरात्री शास्त्रीनगर परिसरात घडली. या हल्ल्यात जावई अक्षय बोढे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.