दिलासा! पहिल्यांदा विदर्भातच सापडला होता 'डेल्टा व्हेरियंट', पण...

mutant
mutante sakal
Summary

ज्यात नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटचे 16 रुग्ण सापडले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये विदर्भातील एकाही रुग्णाचा समावेश नाही.

नागपूर : राज्याच्या आरोग्य विभागाने (maharashtra health department) सर्व जिल्ह्यांमधून ७५०० हजार नमुने गोळा केले होते. त्यापैकी राज्यात नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटचे (delta plus variant) 16 रुग्ण सापडले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये विदर्भातील एकाही रुग्णाचा समावेश नाही. (vidarbha region not have single case of delta plus variant yet)

mutant
खूशखबर! लहान मुलांना सप्टेंबरपर्यंत मिळणार लस; एम्सची माहिती

नवीन डेल्टा प्लस व्हेरीयंटमध्ये कोकण, मुंबई आणि जळगावचा समावेश आहे. सुरुवातीला ओरीजनल कोरोना विषाणूपासून म्युटेड झालेला डेल्टा व्हेरियंट हा विदर्भातील अमरावतीमध्ये सापडला होता. त्यामुळेच फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या वाढल्याचे बोलले जाते. मात्र, 'डेल्टा प्लस व्हेरियंट' हा डेल्टा व्हेरियंटमध्ये म्युटेड होऊन तयार झाला आहे. तरीही विदर्भात एकही रुग्ण नाही हे दिलासा देणारी बाब आहे.

''सध्या नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूमध्ये म्युटंट तयार होण्याची शक्यता कमी आहे. दुसरी लाट विदर्भात आधीच आली. त्यानंतर रत्नागिरी आणि कोकणात शेवटी पोहोचली. आताही या जिल्ह्यांमधील पॉझिटिव्ही रेट जास्त आहे. अनेक लोकांना अजूनही लागण झालेली नाही. त्यामुळे या भागात विषाणू म्युटंट तयार करण्याची शक्यता जास्त आहे. तसेच विदर्भातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे'', असे साथरोग तज्ज्ञ डॉ. शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

विषाणूचे म्युटंट तयार होणे हे कोणत्याही विषाणूचे वैशिष्ट्य असते. तसेच विदर्भात हा व्हेरियंट सापडला तरीही यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट हा नवीन असला तरी आताच दुसरी लाट येऊन गेली आहे. यामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली आहे, असे साथरोग तज्ज्ञ डॉ. आनंद थट्टे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दोन्ही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार विदर्भ विशेषतः नागपूर जिल्हा आणि शहर पुढील काही आठवड्यांसाठी तरी सुरक्षित असेल. मात्र, बेसावध न होता काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

राज्याच्या कोविड टास्ट फोर्सने देखील डेल्टा प्लस व्हेरियंटच्या प्रभावाचा अभ्यास करत आहे. सापडलेल्या रुग्णांची पूर्ण माहिती घेणे सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रवास, लसीकरण आणि संसर्ग याबाबत पूर्ण माहिती तपासली जाईल. डेल्टा आणि डेल्टा प्लस या दोन्ही व्हेरियंटबाबत विस्तृत माहिती मिळविली जात आहे. त्यानंतरच्या अभ्यासानंतर हा डेल्टा प्लस म्युटंट किती धोकादायक आहे हे समजू शकेल, असे टास्ट फोर्सच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com