खूशखबर! लहान मुलांना सप्टेंबरपर्यंत मिळणार लस; एम्सची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination to Children

खूशखबर! लहान मुलांना सप्टेंबरपर्यंत मिळणार लस; एम्सची माहिती

नवी दिल्ली : दोन वर्षे वयावरील मुलांना सप्टेंबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईल, अशी माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. मुलांसाठी सुरु असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर त्याच महिन्यांत त्याला मंजुरीही मिळेल असं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. (Covaxin for children above 2 years by September says AIIMS chief Guleria)

त्याचबरोबर जर PFizer-BioNTech च्या लसीला भारतात हिरवा कंदील मिळाला या लसीचा देखील लहान मुलांसाठी पर्याय असू शकेल, असंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. दिल्ली एम्सनं यापूर्वीच लहान मुलांवरील ट्रायल सुरु केली आहे. ७ जूनला ही ट्रायल सुरु झाली असून यामध्ये २ ते १७ वयोगटातील मुलं सहभागी झाली आहेत.

दरम्यान, DCGIनं लहान मुलांसाठी भारत बायोटेकला १२ मे रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायल्सला परवानगी दिली आहे.

सिरो सर्व्हे काय म्हणतोय?

नुकत्याच झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये लहान मुलांमधील अँटिबॉडी चांगल्या प्रकारे तयार होत असल्याचं समोर आलं आहे. यापार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं की, "लहान मुलांमध्ये चांगल्या अँटिबॉडी तयार होत असल्याने त्यांच्यावर कोरोनाच्या संसर्गाचा वाईट परिणाम होईल असं वाटत नाही. जेव्हा मुलं ट्रायल्ससाठी आली तेव्हा त्यांच्या शिरिरात आधीच अँटिबॉडीज असल्याचं दिसून आलं. म्हणजेच या मुलांना लस दिलेली नसतानाही त्यांच्या शरिरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली. त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्याच काही प्रमाणात संरक्षण असल्याचं सिद्ध झालं आहे.

टॅग्स :corona vaccine