Gadchiroli Tiger Attack :
esakal
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला परिसरात रविवारी सकाळी थरारक घटना घडली. शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.