

Nagpur Weather Forecast Yellow Alert Likely After October 17 as Return Monsoon Rains May Hit Several Vidarbha Districts
sakal
नागपूर: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात १७ आॅक्टोबरनंतर परतीच्या पावसाची शक्यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी बरसल्यानंतर पावसाने गाशा गुंडाळला. जवळपास तीन आठवड्यांपासून शहरात पावसाचा एक थेंबही न पडल्याने बळीराजासह नागपूरकरही चिंतेत आहेत.