Aqua Therapy India: गडचिरोलीत डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेच्या पुढाकाराने विदर्भातील पहिले जल-उपचार (ॲक्वा थेरपी) सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे सेंटर लकवा व अर्धांगवायूग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी मोठे पाऊल ठरते.
गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. अभय व डाॅ. राणी बंग यांच्या सर्चच्या वतीने गडचिरोलीत ॲक्वा थेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे विदर्भातील पहिलेच सेंटर आहे.