Vidhan Sabha 2019 : 'मराठा समाजाची मते राष्ट्रवादीने वळवली' (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Monday, 21 October 2019

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारसभा मारलेली मुसंडी भाजपाकडे जाणारी मराठा मते वळविण्यात यश मिळाले असल्याचे दिसत असल्याचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारसभा मारलेली मुसंडी भाजपाकडे जाणारी मराठा मते वळविण्यात यश मिळाले असल्याचे दिसत असल्याचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. आपला मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पावसापेक्षा मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. वरळी येथे काल रात्री सापडलेल्या चार कोटी रुपयांवरून निवडणूक आयोग नक्की कारवाई करेल, असा आशावाद ऍड.आंबेडकर यांनी व्यक्त केला.

वरळीत आम्हाला फायदा होईल
आंबेडकर म्हणाले, 'मी आशावादी आहे. आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी समाधानी आहे. भाजपने मुंबईतही सभा घेतल्या. पण, त्यांना यापूर्वी सारखा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. मुंबईत वरळीमध्ये एका कार्यालयात चार कोटी रुपये सापडले. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये फार सख्य आहे, असं काही दिसत नाही. त्यांच्या भांडणाचा वरळीत लाभ होईल, असं आम्हाला वाटतं.'

मराठा मतं राष्ट्रवादीनं वळवली
वंचित बहुजन आघाडीची लढत राज्यात नेमकी कुणाविरुद्ध आहे? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राज्यात आमची लढाई शिवसेना-भाजप विरुद्ध आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पिकअप घेताना दिसत आहे. पण, काँग्रेस कुठच दिसली नाही. राष्ट्रवादी वाढणं म्हणजे, भाजपला धक्का असं निरीक्षण आहे. जी मराठा समाजाची मतं भाजपकडं वळली होती. ती पुन्हा राष्ट्रवादीकडं वळल्याचं आम्हाला दिसत आहे. त्यामुळं भाजपचा प्रभाव कमी झाल्याचं आम्हाला दिसत आहे.' आंबेडकर म्हणाले, 'राज्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण होतं. त्यामुळं ज्या पद्धतीने प्रचार करावा तसा करता आला नाही. अनेक ठिकाणी जाहीर सभा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळं नोव्हेंबरमध्ये निवडणुका घ्याव्यात, असा आमचा आग्रह होता. पण, मी मतदारांना आवाहन करतो. की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मतदानाला बाहेर पडावे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 adv prakash ambedkar reaction after voting Akola