Vidhan sabha 2019 : सावनेरमधील गुंडगिरी संपविणार - अमित शहा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले. 

खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले. 
सावनेर येथील भाजपचे उमेदवार डॉ. राजू पोतदार आणि कामठीचे उमेदवार टेकचंद सावकर यांच्या प्रचारार्थ चनकापूर-खापरखेडा येथे घेण्यात आलेल्या महाजनादेश संकल्पसभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाची संकल्पना सांगून शहा यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या कामाचा समाचार आमचा एक कार्यकर्ता घेऊ शकतो असे सागून त्यांना आव्हान दिले. भाजपचे सरकार राज्यात आल्यावर नागपूरमध्ये शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या आहेत. 
कॉंग्रेसवर टीका करताना राहुल गांधी यांच्यावर वक्तव्याचा पाकिस्तान फायदा घेत आहे. राहुल व पाकिस्तान हे सारखचे कसे बोलतात असाही प्रश्‍न त्यांनी केला. काश्‍मीरमधून 370 कलम हटविल्याचाही उल्लेख करीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने यावर भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहनही केले. लोकांच्या पाठिंबा आणि प्रयत्नामुळे भाजप-सेना दोन तृतीयांश बहुमताने निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, डॉ. राजीव पोतदार, टेकचंद सावरकर, ऍड. सुलेखा कुंभारे, निशा सावरकर, अशोल मानकर, प्रकाश टेकाडे आदी उपस्थित होते. 

बावनकुळेंच्या कामांची प्रशंसा 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये 19 हजार कोटींची कामे आहेत. याची माहिती आपल्याला आहे. त्यांच्या कामांबद्दल बोलायचे असेल तर एका दिवसाचे भाषण नव्हे तर सात दिवसांचा भागवत सप्ताहदेखील कमी पडेल, असेही सांगून अमित शहा यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या कामाची प्रशंसा केली. 

हार्दिक पटेलांच्या सभेला नकार 
खापरखेडा येथे आजची सुनील केदार यांच्या प्रचारासाठी हार्दिक पटेल यांची सभा होती. मात्र, शहा यांची सभा असल्याने पोलिसांनी पटेल यांच्या सभेला नकार दिला. हार्दिक पटेल यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते खापरखेडा येथे आले होते. मात्र, त्यांची निराशा झाली. पटेल यांची सभा आता उद्या शनिवारी होणार आहे. पटेल यांच्या सभेसाठी पोहोचलेले कार्यकर्ते शहा यांच्या सभेत गोंधळ घालू शकतात या शक्‍यतेमुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 : hooliganism will end in Sawner