Vidhan sabha 2019 : उमरेडमध्ये काँग्रेसकडून कोण लावतोय ताकद 

वीरेंद्रकुमार जोगी
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नागपूर : उमरेड विधानसभा मतदारसंघात पारवे विरुद्ध पारवे असा सामना होत असून, कुठल्या पारवेंना मतदार विधानसभेत धाडतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपने तिसऱ्यांदा आमदार सुधीर पारवे तर कॉंग्रेसने त्यांचेच चुलतबंधू राजू पारवे यांना उमेदवारी देऊन येथे रंग भरला. कॉंग्रेसच्या पारवेंसाठी राजेंद्र मुळक यांनी ताकद लावली असून, सुधीर पारवे स्वभावाप्रमाणे शांतचित्ताने प्रचार करीत आहे. 

उमरेड विधानसभा मतदारसंघात राजेंद्र मुळक यांचा प्रभाव कायम आहे. ते यंदा उमेदवार नसल्याने उमरेडवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच सर्वांचा विरोध पत्करून त्यांनी राजू पारवे यांना कॉंग्रेसची उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. ते स्वत: राजू पारवे यांच्या प्रचारासाठी धुराळा उडवित आहे. राजू पारवे यांनी आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. आपला माणूस असा ते स्वत:चा प्रचार करीत आहे. त्यांना संजय मेश्राम यांचेही पाठबळ असल्याने हौसला बुलंद झाला आहे. ग्रामीण भागात स्वत: मुळक राजू पारवे यांच्यासह दौरे करीत असल्याने ही जमेची बाजू ठरली आहे. मात्र, निवडणूक लढताना केवळ पाठिंबाच गरजेचा नाही, हे त्यांना अद्याप उमगले नसल्याने त्यांच्या प्रचारात कमतरता बऱ्याच आहे. त्याचा मोठा फटका मतदानाच्या वेळी बसू शकतो, असे चित्र दिसू लागले आहे. 
राजू पारवे हे गावागावांतून प्रचार करीत असले तरी त्यांच्यासमोर संघटित असलेल्या भाजपचे आव्हान आहे. दोन वेळा विजय मिळविणारे सुधीर पारवे हे भाजपच्या संघटित प्रचारामुळे निवडून आले आहे. याचमुळे त्यांचा प्रचार राजू पारवे यांच्या तुलनेत प्रभावी ठरणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पारंपरिक मतदार असलेल्यांच्या भरवशावर ही निवडणूक भाजपसाठी यावेळी सोपी राहिलेली नाही. मात्र, मागील निवडणुकीत बसपकडून लढणारे रुक्षदास बन्सोड हे निवडणुकीसाठी तयार नसताना वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी ते दुसऱ्या स्थानी होते. यावेळी ते कुणाची मते खाणार यावरही विजयी उमेदवाराचे भविष्य ठरणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan sabha 2019 : Who is pushing the Congress from Umrad?