esakal | अडीच वर्षांच्या चिमुकलीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, कामगिरी वाचून व्हाल थक्क

बोलून बातमी शोधा

vidisha sherekar
अडीच वर्षांच्या चिमुकलीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, कामगिरी वाचून व्हाल थक्क
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षाच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले आहे. ती दोनशेपेक्षा जास्त देशांच्या राजधान्या आणि त्यांचे ध्वज अचूकपणे सांगतेय. तिच्या या बुद्धिमत्तेची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. याआधी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडियाच्या पद्‌मापूर शाखेत साहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत वैभव शेरेकर हे मूळचे अकोल्याचे. त्यांना वैदिशा ही एकुलती एक मुलगी. वौदिशा एक वर्षाची असतानापासून कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्याची कल्पना आई दीपालीला आली. वौदिशाला काहीही सांगितले तर ते तिच्या लक्षात राहायचे. तिच्या बुद्धमत्तेचा कसा सदुपयोग करता येईल, यावर शेरेकर कुटुंबीयांनी बराच विचार केला. त्यातून त्यांना मार्ग सापडला. आता वौदिशा जवळपास अडीच वर्षांची झाली. ठरल्याप्रमाणे तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी, त्यातल्या देशांचे राष्ट्रध्वज असलेले चार्ट आणून देण्यात आले. आईवडिलांनी तिला राजधानी, राष्ट्रध्वजाची माहिती दिली. तिने केवळ पंधरा दिवसांत दोनशेपेक्षा जास्त देशांच्या राजधान्या, त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयार केली. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीची दखल जानेवारी महिन्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने वौदिशाने इतक्‍या लहान वयात केलेल्या असाधारण कामगिरीची दखल घेतली. इंटरनॅशनल बुक रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदवून तिचा जागतिकस्तरावर गौरव केला. गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसाठी ती आता कसून सराव करीत आहे. इतक्‍या लहानशा वयात दोन मोठे प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणे ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.