भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

नागपूर : कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली असून येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलणार असल्याचा दावा विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नागपूर : कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली असून येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलणार असल्याचा दावा विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली आहे. भाजपला मुख्यमंत्रिपद सोडायचे नाही. अशा परिस्थित सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हाच पर्याय सध्या उपलब्ध आहे. सरकार स्थापन करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. पाठिंब्याबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सेनेच्या पाठिंब्याबात अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कुठल्याहीक्षणी आम्ही एकत्र येऊ शकतो असे सूचक विधानही वडेट्टीवार यांनी केले. 
गेल्या पाच वर्षांत भाजपने महाराष्ट्राला खड्ड्यात टाकण्याचे काम केले आहे. जनतेचा दिलेल्या कौलाचाही त्यांनी मान ठेवलेला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा सत्तेत येऊ नये, ही कॉंग्रेसच्या सर्व आमदारांसह सर्वसामान्य जनतेचीही इच्छा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळून सरकार स्थापन केल्यास कॉंग्रेस सोबत जाणार की बाहेरून पाठिंबा देणार या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची वाट बघावी लागणार असल्याचे सांगितले. शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा पाहिजे असल्यास त्यांना आपल्या विचारसरणीशी तडजोड करावी लागेल. केंद्रात असलेल्या मंत्रिपदावरही त्यांना पाणी सोडावे लागेल. त्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकेल, असेही वडेट्टीवार यांनी म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay vadettivar, congress