अंकिता जळीतकांड : घटनेच्या दिवशी विकेशची होती साप्ताहिक सुटी; कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिली माहिती

Vikesh had a weekly holiday on the day of the incident hinganghat case
Vikesh had a weekly holiday on the day of the incident hinganghat case

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता जळितकांड घडले त्या दिवशी आरोपी विकेश नगराळेची साप्ताहिक सुटी असल्याची माहिती तो कार्यरत असलेल्या मेगारेल कंपनीच्या कर्मचाऱ्याने न्यायालयात दिली. या प्रकरणात मंगळवारी (ता. ६) पाच जणांची साक्ष नोंदविण्यात आली. आतापर्यंत २६ जणांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. पुढील सुनावणी गुरुवारी (ता. ८) असून यात काही महत्त्वाच्या साक्षी नोंदविण्यात येणार आहेत.

अंकिता पिसुड्डे जळितकांड प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकारी असलेल्या पाच जणांची साक्ष काल पूर्ण झाली होती. आज पाच साक्षी पूर्ण झाल्या. आजची साक्ष पोलिस हवालदार मनोज लोहकरे, न. प. अभियंता माळवे, मेगारेलचे कर्मचारी दीपकसिंग ठाकूर, बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे व वोडाफोनचे नोडल अधिकारी दत्ता आगरे यांची सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाली.

हिंगणघाटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडिवार यांची सरतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. पण उलटतपासणी अपूर्ण राहिली. बंडिवार यांच्या उलटतपासणी सोबतच ज्यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला, त्या उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव तसेच जिओ फोनचे नोडल अधिकारी यांची साक्ष पुढील तारखेला होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. 

अंकिता पिसुड्डे जळितकांड प्रकरणाचे कामकाज मंगळवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समक्ष सुरू झाले. दुपारी अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत या प्रकरणाचे सलग कामकाज चालले. आरोपी विकेश नगराळे हा मेगारेलमध्ये कार्यरत होता. तेथील त्याचा पर्यवेक्षक दीपकसिंग ठाकूर याची आज साक्ष झाली. त्याने आपल्या साक्षीतून घटनेच्या दिवशी विकेशची साप्ताहिक सुट्टी असल्याने तो कामावर गैरहजर असल्याचे सांगितले.

घटनेच्या पूर्वीच्या दोन दिवसांत तो कामावर हजर असल्याचे सांगतानाच घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला बडतर्फ करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. बुटीबोरीचे पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी आरोपी विकेशला टाकळघाट येथून ताब्यात घेतले. तो घटनाक्रम त्यांनी आपल्या साक्षीमध्ये विशद केला.

वोडाफोनचे नोडल अधिकारी दत्ता आगरे यांची साक्ष ते पुणे येथे असल्याने दृकश्राव्य माध्यमातून झाली. आज सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाग घेतला त्यांना सरकारी वकील वैद्य यांनी सहकार्य केले तर आरोपी तर्फे ऍड. भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com