

Bori Khurd Villagers Protest by Performing Funeral at Gram Panchayat Office Due to Absence of Cremation Ground
esakal
-सुमीट हेपट
मारेगाव : गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मृतांवर जंगल परिसरात उघड्या जागेत अंत्यसंस्कार करावे लागते. स्मशानभुमी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार केले. ही घटना मंगळवारी (ता. 28) बोरी खुर्द येथे घडली. घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गावातील संताप उफाळून आला आहे.