अपघातग्रस्त बसला वाट मोकळी करून देण्यासाठी त्याने घेतला हा निर्णय...

Villagers praise driver after accident in Bhandara
Villagers praise driver after accident in Bhandara

वरठी (जि. भंडारा) : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एका बसचा अपघात झाला... रस्त्यापासून बस वीस फूट खाली उतरली... बाहेर निघण्यासाठी रस्ता काही मिळत नव्हता... यामुळे बसमध्ये बसलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता... बस चिखलात फसल्याने बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली... चिखलातून बस बाहेर निघाली खरी पण समोरचा मार्ग काही सापडत नव्हता... बसला जाण्यासाठी मार्ग मिळावा म्हणून त्याने चक्‍क घराचे कुंपण तोडून मार्ग मोकळा करून दिला. चेतक डोंगरे असे त्या इसमाचे नाव... 

तुमसरवरून नागपूरला जाणारी प्रवासी बस दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाजवळ खाली उतरली. यात 39 प्रवासी, चालक व वाहक असे 41 जण होते. बस पुलाखाली उतरल्याची माहिती मिळताच नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी केली. बसची अवस्था पाहून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. अपघाताची भीषणता दिसत होती. 

चालकाचे नियंत्रण सुटले असते तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. अपघातात चालकाने शेवटपर्यंत बसवर ताबा ठेवल्याने सर्व जण सुखरूप बचावले. यानंतर दिवसभर चालकाच्या कामगिरीची गावात चर्चा होती. चिखलातून बसला बाहेर काढण्यासाठी मार्ग सापडत नव्हता. अखेर चार तासांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बस बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला यश आला. 

यावेळी शेकडो नागरिक जमा झाले होते. बस बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी चालक संदेश वहाणे व वाहक सोपान तुबुडे यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच संजय मिरासे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, उद्योजक माणिक शहारे, माजी मुख्याध्यापक हरिभाऊ भाजीपाले, चेतक डोंगरे व गावकरी उपस्थित होते. 

चालक, वाहकाचा गावकऱ्यांनी केला सत्कार

अचानक बससमोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने घेतलेल्या निर्णयामुळे 39 प्रवाशांचा जीव धोक्‍यात आला होता. त्यामुळे राज्य महामार्गावरून खाली उतरलेली बस वीस फूट खाली उतरली. मात्र, चालकाने शेवटपर्यंत बसवर नियंत्रण ठेवल्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले. चार तासांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बस बाहेर काढण्यात यश मिळाले. यात आपले कसब पणाला लावून आलेल्या संकटाचा मुकाबला करणाऱ्या चालक व वाहकाचा गावकऱ्यांनी गुरुवारी सत्कार केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com