तंटामुक्त गाव समित्या इतिहासजमा

ग्रामपंचायतींमध्ये कागदावरच अस्तित्व; ग्रामीण भागात तंट्यांमध्ये वाढ; जागृतीची गरज
तंटामुक्त गाव समित्या
तंटामुक्त गाव समित्याsakal
Updated on

जामली, (जि.अमरावती) : शासनाने ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समित्या आज इतिहासजमा झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी या समित्यांमुळे गावातील अनेक समस्या, मिटविण्यात बरीच मदत मिळत होती. पण, आज या समित्या कार्यरत नसल्याने गावातील तंटे वाढू लागले आहेत. (villages tantamukti samiti in history)

गावपातळीवर तंटामुक्ती सदस्यांची निवड १५ ते ३० ऑगस्टच्या कालावधीत होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून होत होती. परंतु, आता मात्र तंटामुक्त समित्यांमध्ये किती आणि कोण सदस्य आहेत याची पाटी कोरीच असल्याचे दिसून येते. शासन नियमानुसार प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे. याबाबत अनेक गावांना तंटामुक्ती पुरस्कारही मिळाले आहेत. या समितीचा फलक ग्रामपंचायतीमध्ये लावणे बंधनकारक आहे.

तंटामुक्त गाव समित्या
५० हजार पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले, साडपाचशे कोटी अडकले

परंतु, बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये समिती फलक कागदावरच असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर झालेला प्रसार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महिलांच्या संदर्भातील तंटे, गुन्हे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे तंटामुक्त समित्या पूर्ववत करण्याची गरज आहे. शासनाने पुन्हा एकदा नव्याने गावपातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त योजनेबाबत जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.

गावखेड्यात तंट्यांमध्ये वाढ

गावातील कोणताही तंटा मिटविताना तंटामुक्त समितीतील सर्व सदस्यांना तंटे मिटविण्यापूर्वी, तसेच तंटे मिटविण्याच्या जागी बोलविणे गरजेचे असते. अध्यक्ष सोडले तर इतर सदस्यांना याबाबत माहितीदेखील नसते. त्यामुळे सदस्यांत नाराजीचा सूर आहे. परिणामी गावखेड्यात तंट्यांमध्ये वाढ होत चालली आहे.

तंटामुक्त गाव समित्या
बांग्लादेशींना मांसाहार पचविण्यासाठी हवीत संत्री! सर्वाधिक संत्री आयात करणारा देश

अनेक गावांमध्ये ‘तंटामुक्त गाव’ असे फलक आजही आहेत. परंतु, तंटामुक्त गाव समित्या अस्तित्वात नाहीत. गावागावांत तंट्यांमध्ये वाढ होत असून, कौटुंबिक कलहामुळे अनेक संसार उघड्यावर येत आहेत.

-बब्बू अजनेरिया, अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना, चिखलदरा, जि. अमरावती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com