esakal | Video : जागते रहो! या गावातील तरुणांनी देशहितासाठी कसली कंबर
sakal

बोलून बातमी शोधा

pahara

एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आंतरजिल्हा बंदीचाही निर्णय घेण्यात आला.
गोंडपिपरी तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी तालुक्‍यातील वढोली येथील काही युवक समोर आले.

Video : जागते रहो! या गावातील तरुणांनी देशहितासाठी कसली कंबर

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कोरोना रोखण्यासाठी प्रशासन जिवाचे रान करीत आहे. अशात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी सोबतच आंतरजिल्हा बंदीचाही निर्णय घेतला.
ग्रामीण भागात पुरेशी शासकीय यंत्रणा नसल्याने वढोलीचे उपसरपंच अन काही तरुणांनी गावातील मुख्य मार्गावर पहारा देत प्रशासनाला मदतीचा हात दिला. हे तरुण सुरक्षेसह नियमांचेही पालन केले.


चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍याला तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. लॉकडाऊन, 144 कलम जारी झाल्यानंतर देखील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. 22 मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यु काटोकोरपणे पाळण्यात आला. पण दुसऱ्याच दिवशी नागरिक सामान्य स्थिती असल्यासारखे वागू लागले. आधीच कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना ही बाब अधिकच चिंता निर्माण करणारी होती. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात संचारबंदी लागू केली. एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आंतरजिल्हा बंदीचाही निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा - त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग! वाचा यांची संवेदनशीलता

गोंडपिपरी तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. अशा स्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी तालुक्‍यातील वढोली येथील काही युवक समोर आले. वढोली येथील उपसरपंच मोहन चुधरी, युवा कार्यकर्ता सुरज माडूरवार, रुपेश मेदाडे, सुरेंद्र मडपल्लीवार या तरुणांनी मुख्य मार्गावर खडा पहारा देणे सुरू केले आहे. पोलिस व प्रशासनाला मदतीचा हात देत स्वत:ची सुरक्षा सांभाळत ते चांगला उपक्रम पार पाडत आहेत.