esakal | संचारबंदीचे उल्लंघन; पोलिसांनी काढून घेतल्या दंडबैठका
sakal

बोलून बातमी शोधा

kanshivni.jpg

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असताना काणशिवणी परिसरातील नागरिक गरज नसताना घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीला पायदळी तुडविण्यात येत आहे. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिसांनी ॲक्शन मोडवर येऊन कामकाज करण्यास सुरूवात केली आहे.

संचारबंदीचे उल्लंघन; पोलिसांनी काढून घेतल्या दंडबैठका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कानशिवणी (जि. अकोला) : देशात कोरोनाच्या वाढता संसर्गाने थैमाने घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये असे, शासनाकडून आवाहन केल्यावरही अतिउत्साही कार्यकर्ते घराबाहेर पडत असल्याने बोरगाव मंजू पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थेट दंडबैठका काढायला लावण्यात येत आहे. तर काहींना कायद्याची भाषाही सांगितल्या जात आहे.

हेही वाचा- अकोला येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा अकोट फैलातील 

कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असताना काणशिवणी परिसरातील नागरिक गरज नसताना घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीला पायदळी तुडविण्यात येत आहे. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिसांनी ॲक्शन मोडवर येऊन कामकाज करण्यास सुरूवात केली आहे. ठाणेदार हरिश गवळी यांच्या मार्गदर्शाखाली उपनिरीक्षक संतोष अघाव, विष्णू ढोरे, हर्षल डोंगरे, श्रीराम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. काणशिवणी परिसरात रात्रदिवस पेट्रोलिंग केला जात आहे.


उल्लंघन केल्यास होणार कारवाई
विनाकारण घराबाहेर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. त्यांच्याकडून दंडबैठका काढून त्यांना समज दिल्या जात आहे. परिसरमधील जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकान ,भाजीपाला, पिठगीरणी सह आदींना शासनाने दिलेल्या वेळेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या. तसेच पोलिसांकडून स्वच्छता पाळणे, वारंवार हात धूने, सोशल डिस्टन्स ठेवणे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. अशा गावपातळीवर सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहेत. यावेळी पोलिस पाटील माणिकराव वाघमारे तंटामुक्ती अध्यक्ष किरण शिवणकर पंचायत समिती सदस्य राजेश वावकार उपस्थित होते.