
मोताळा : तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांवर येथील संतप्त जमावाने दगड व तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (ता.२३) दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जवळपास २५ ते २५ कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच पोलिस आणि वनविभागाच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.