VIRAL AUDIO : प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलांनी केले फोन, मतदारांचे त्यांनाच उलट सवाल

सचिन शिंदे
Sunday, 22 November 2020

मतदार सुशिक्षित असल्याने त्यांना आश्वासनाची भूरळ घालणे आता कठीण झाले आहे. कारण मतदार प्रचार करणाऱ्यांनाच उलट प्रश्न विचारत आहेत. तुमच्या वडिलांनी काय काम केले? हे आधी त्यांना विचारा मग प्रचार करा, असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रचाराचे अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत.

आर्णी (यवतमाळ ) :  विधानपरिषदेच्या १२ सदस्यांसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत जोर धरू लागला. उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचारासाठी नवनवीन शक्कल लढविली जात आहे. शिक्षक मतदारांना आपली भूरळ घालण्यासाठी वेगवेगळ्या आमिषांचे प्रलोभने देताना प्रचार यंत्रणा दिसून येत आहे. यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार श्रीकांत देशपांडेंची मुली आणि मुलाने मतदारांना प्रचारासाठी फोन केला आहे. मात्र, मतदारांनीच त्यांचे जुने कामे काढून त्यांची खरडपट्टी काढल्याचे दिसून येते.

हेही वाचा - रस्ता भटकलेला 'जान' तासाभरातच आईच्या कुशीत, मूल पोलिसांच्या प्रयत्नाला यश

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारांनी तर आपले संपूर्ण कुटुंबच प्रचार करण्यासाठी कामाला लावले आहे. उमेदवारांचे मुले दूरध्वनीवरून थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या खुशालीची चौकशी करीत आपल्या वडिलांसाठी मताची भीक मागताना दिसून येत आहे. मात्र, मतदार सुशिक्षित असल्याने त्यांना आश्वासनाची भूरळ घालणे आता कठीण झाले आहे. कारण मतदार प्रचार करणाऱ्यांनाच उलट प्रश्न विचारत आहेत. तुमच्या वडिलांनी काय काम केले? हे आधी त्यांना विचारा मग प्रचार करा, असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रचाराचे अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दूरध्वनीवरुन संवाद साधणाऱ्या मुला, मुलींना मात्र आपल्या निष्क्रिय वडिलांचा होत असलेला अपमान सहन करावा लागत आहे. हेच ऑडियो रेकॉर्डिंग सोशल मीडियावर विनोदी भाग म्हणून पाहिले जात आहे. यातून होणारा विनोद मात्र त्यांच्या कार्याची प्रचिती करून देत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral audio clip of mla shrikant deshpande daughter and son for election campaign