esakal | ‘सोशल मीडिया’ जपतोच भावनिक ओलावा, लॉकडाऊमध्ये हाच एकमेव पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

social media at washim.jpg

नवतंत्रज्ञान शाप आहे आणि वरदानही, त्याचा उपयोग कसा होतो यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे.

‘सोशल मीडिया’ जपतोच भावनिक ओलावा, लॉकडाऊमध्ये हाच एकमेव पर्याय

sakal_logo
By
राजदत्त पाठक

वाशीम : कोविड-19 च्या भीतीने सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘सोशल डिस्टंन्सिंग’ चा नारा घमतोय. शुद्ध मराठीत याला ‘सामाजिक दूरी’ म्हणतात. विविध जाती धर्मापंथात विभागलेल्या आपल्या समाजाला हे पेलवणारे नाही. यामुळेच सोशल मीडियाने या काळात भावनिक ओलावा जपून सामाजिक मनात डिस्टंस येऊ दिलेला नाही. मोबाईलमधील विविध अ‍ॅप व व्हिडीओ कॉलद्वारे कितीही दूर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचे दर्शन होऊन संवाद साधल्या जात आहे.

नवतंत्रज्ञान शाप आहे आणि वरदानही, त्याचा उपयोग कसा होतो यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे. अफवा पसरविणे हा सोशल मीडियावरील आरोप काही अंश सत्य असला तरी समाजाला नवी दिशा देणे मनामनात आनंद निर्माण करणे व्यक्ती-व्यक्तीमधील नाते जपणे भावनिक ओलावा जपणे ही कामे हाच मीडिया करीत आहे.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

जिल्ह्यातील गावागावात याची प्रचिती येत आहे. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगमुळे एका गावातील व्यक्ती दुसर्‍या गावी जाऊ शकत नाही. येथील बहुतांश प्रसूती रुग्णालयात पुणे-नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, अशा ठिकाणच्या महिलांची प्रसूती झाली आहे. माहेरवाशीण, सासुरवाशीण आपल्या माणसांपासून दुरावल्या गेली आहेत. नवजात मुलगा-मुलगी मार्च ते मे दरम्यान दोनअडीच महिन्याचे झाले. 

परगावी राहणारे दादा-दादी, आत्या, मावशी-बहीण, भाऊ मुलीला-मुलाला सुनेला बहिणीला झालेल्या नव्या पाहुण्याला प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत. अशावेळी ‘मै हुना’ असे म्हणत सोशल मिडीया धावून आला. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरील ‘व्हीडीओ’ कॉलने नातवाचे-नातीचे दर्शन प्रत्यक्ष घडतेच. वाशीममध्ये राहणारी मुलगी सून पुण्यातील, राजस्थानातील आपल्या सासरच्या लोकांशी संवाद साधतेय, इवल्याशा बाळाचे दिवसागणिक होणारी प्रगती आपल्या माणसांना कौतुकाने सोशल मिडीया द्वारेच दाखविले. 

तर आई आपल्या दूर असलेल्या लाडक्या मुलाला पाहून बोलू शकते आणि समाधान पावते. यामुळे भावनिक ओलावा जपल्या जातोय. देश-विदेशातील मुलामुलींची भेट सोशल मिडयाद्वारे होत आहे. कोरोना विषाणूंचा भयंकर उद्रेक कैदेप्रमाणे वाटणारे लॉकडाऊन, महिला युवक, ज्येष्ठ नागरिक, बच्चे कंपनीची परीक्षा पाहत असताना ‘लहरोसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करेवाले की हार नाही होती.’ हाच संदेश यातून मिळत आहे.  

नवतंत्रज्ञानाच्या उपयोगावर श्रेष्ठत्व अवलंबून
नवतंत्रज्ञान शाप आहे आणि वरदानही, त्याचा उपयोग कसा होतो यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे. अफवा पसरविणे हा सोशल मीडियावरील आरोप काही अंश सत्य असला तरी समाजाला नवी दिशा देणे मनामनात आनंद निर्माण करणे व्यक्ती-व्यक्तीमधील नाते जपणे भावनिक ओलावा जपणे ही कामे हाच मिडीया करीत आहे. जिल्ह्यातील गावागावात याची प्रचिती येत आहे.

मुलाची खुशाली प्रत्यक्ष पाहते : संगवई
माझा मुलगा पुणे येथे कंपनीत नोकरी करतो. सध्या त्याची कंपनी बंद आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे त्याला वाशीम येथे येता येत नाही. त्यामुळे त्याला येणार्‍या अडचणी विविध मोबाईलमधील व्हीडीओ कॉलद्वारे सोडविते. त्याची खुशालीही प्रत्यक्ष पाहता येते. सोशल मीडियामुळे तो जवळच असल्यासारखे वाटते, अशी प्रतिक्रिया मुलाची आई सरोज संगवई यांनी व्यक्त केली.