15-Year-Old Boy Drowns in Wainganga River During Makar Sankranti Bath
esakal
सिहोरा (जि. भंडारा) : मकरसंक्रांतीनिमित्त तामसवाडी गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तीनपैकी एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. दोघे थोडक्यात बचावले. ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने तामसवाडी गावावर शोककळा पसरली आहे. क्षितिज लीलाधर लांजेवार (वय १५) असे मृताचे नाव आहे.