

वणी: वणी तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी पीकविमा भरपाई तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आली होती. आता उपग्रहाद्वारे पाहणी करून जो नुकसानीचा आढावा घेण्यात आला होता, त्याची फेरतपासणी करुन शेतकर्यांना न्याय द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्ताजी भरणे यांनी संबंधीत कंपनी व कृषी विभागाला दिले आहे.