

Wardha Accident
sakal
अल्लीपूर (जि. वर्धा) : चार मित्र कामाची बोलणी करण्याकरिता वेळा येथून परत येत असताना त्यांच्या कारला जबर अपघात झाला. यात तिघांचा जागीत मृत्यू झाला असून, अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. चार) अल्लीपूर-धोत्रा महामार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ रात्री घडली. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.