esakal | कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोरोना चाचणी करा, वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

haridwar kumbh mela

'कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांनी कोरोना चाचणी करावी'

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

वर्धा : हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळयासाठी वर्धा जिल्हयातून गेलेले काही भावीक आता परतीच्या वाटेवर आहेत. तसेच कुंभमेळ्यामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी कुंभमेळ्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या भाविकांनी कोविड सेंटर येऊ जाऊन तपासणी करावी. तसेच गृहविलगीकरणात राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरण देशभ्रतार आणि पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - भीषण वास्तव! सभोवताली मृतदेहांची गर्दी अन् हाताळणारे फक्त चारच जण

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तसेच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल दास यांचं देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. यामध्ये एकूण 48.51 लाख जण सहभागी झाले होते. आता सर्व परतीच्या मार्गाने निघाले आहेत. त्यामुळे हे लोण पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारी म्हणून वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच कुंभमेळयात गेलेल्या आणि परत आल्यावर गृह विलगिकरणात न राहणाऱ्या व्यक्तींबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथे 100 या क्रमांकावर वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

loading image
go to top