Wardha Accident: कार अपघातात चिमुकल्यासह आई वडिलांचा मृत्यू; हिंगणघाट मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळील घटना, मुलगा गंभीर
Accident News: वर्धा–हिंगणघाट मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात आई–वडील आणि चिमुकल्याचा मृत्यू; दुसरा मुलगा गंभीर. भरधाव वाहनाच्या धडकेने भोयर कुटुंबाचा संसार उदध्वस्त; गावात शोककळा पसरली.
वर्धा : कारला झालेल्या भीषण अपघातात चिमुकल्यासह आई–वडिलांचा मृत्यू झाला. वर्धा-हिंगणघाट मार्गावर सेलू काटे येथील नवोदय विद्यालयाजवळ साेमवारी (ता.२४) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.