

Fake Currency Raids
sakal
वर्धा : शहरातील मध्यभागात असलेल्या केजाजी चौक परिसरात बनावट नोटांचा छापखाना सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा घालून कारवाई केली. यावेळी पाचशेच्या तब्बल १४४ नोटांसह छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले. केजाजी चौकात गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एकास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.