वर्धा : नगरपंचायतीत काँग्रेसला कौल; भाजपची पिछेहाट

Nagar Parishad Wardha
Nagar Parishad Wardha sakal

वर्धा : भाजपचे आमदार असलेल्या तीन विधानसभेत नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात काँग्रेसला २१ तर भाजपला २० जागा मिळाल्या. तर इतर आघाड्या आणि संघटनांनी उभ्या केलेल्या उमेदवारांनी ११ जागा घेतल्या. तर बसपला तीन, शिवसेनेला एक आणि अपक्षांनी सहा जागा बळकावल्या. (Wardha nagar panchayat election)

Nagar Parishad Wardha
सेनगाव : राष्ट्रवादी, सेना, भाजपचा प्रत्येकी ५ जागी विजय

दादाराव केचे आमदार असलेल्या आर्वी विधानभेतील आष्टी आणि कारंजा येथे काँग्रेसने बाजी मारली. यात आष्टीत काँग्रेसल आठ तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. थेट लढत असलेल्या कारंजा येथे काँग्रेसला नऊ आणि भाजपला आठ जागांवर समाधान मानावे लागले. वर्धा विधान सभेतली सेलू येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला सहा आणि काँग्रेसला दोन तर काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला पाच जागा मिळाल्या आहे.

यामुळे येथेही भाजपला नकारल्याचे दिसत आहे. तर आमदार समीर कुणावार यांच्या समुद्रपूर विधानसभेत भाजपला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले. येथे राष्ट्रवादी काँग्रेला चार आणि काँग्रेला दोन जागा मिळाल्या. येथे शिवसेने, बसप आणि अपक्ष, शेतकरी संघटनेने जागा घेतल्याने संमिक्ष कौल दिसत आहे.

Nagar Parishad Wardha
कष्ट व अभ्यासाची तयारी असल्यास यश मिळते - शरद पवार

आष्टी नगरपंचायत

  • काँग्रेस : ०८

  • जनशक्ती : ०५

  • भाजप : ०२

  • बहुजन समाज पार्टी : ०१

  • अपक्ष : ०१

सेलू नगरपंचायत

  • भाजप : ६

  • सेलू सुधार आघाडी : ६

  • काँग्रेस : २

  • साहसिक जनशक्ती संघटना : २

  • अपक्ष : १

कारंजा नगरपंचायत

  • काँग्रेस : ०९

  • भाजप : ०८

समुद्रपूर नगरपंचायत

  • भाजप : ०४

  • काँग्रेस : ०२

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ०४

  • शिवसेना : ०१

  • बसप : ०२

  • अपक्ष : ०४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com