

Wardha
esakal
घुग्घुस: वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. ८) येथे घडली. नदीकाठी पोहोचल्यानंतर आनंदाने काढलेली एक सेल्फी आज त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रपरिवारासाठी आयुष्यभराची वेदनादायी आठवण ठरली आहे. या पाच जिवलग मित्रांना मृत्यूही एकमेकांपासून वेगळे करू शकले नाहीत.