summeer heat
summeer heatsakal

वर्धा : उन्हाचा तडाखा; चार ठिकाणी आग

हवामान खात्याचा तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

वर्धा : हवामान खात्याने तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यात दिवसा उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे. तापमान ४१ अंशावर असताच शहराच उन्हाच्या तडाख्यामुळे मंगळवारी (ता. २९) एकाच दिवशी चार ठिकाणी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान आग लागल्याच्या घटना घडल्या. यात महादेवपुरा परिसरात रोहित्र पेटले. इंजापूर येथील डंपींग यार्डवरील कचऱ्याने पेट घेतला. तर याच सुमारास मोहता जीन आणि गोंड प्लॉट परिसरात रिकाम्या जागेवरील गवताने पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजताच्या सूमारास अचानक डंपींग यार्ड परिसरातून धूर निघताना दिसून आला. पाहता पाहता परिसरात धुराचे मोठे लोळ निघू लागले. स्थानिक नागरिकांनी याची सूचना पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने डंपींग यार्ड परिसरात पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. चार तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग लागलेला परिसर डंपींग यार्डच्या बाजूचा असल्याने मोठे नुकसान टळल्याचे सांगण्यात आले. उन्हाचा तडाखा वाढल्याने वेस्टमटेरीअलचे डंपींग यार्ड परिसरात ढिगारे लागले आहे. यात उन्हामुळे आग लागण्याच्या घटना घडली असून यात कसलेही नुकसान झाले नसल्याचे स्वच्छता अधिकारी विशाल सोमवंशी यांनी सांगितले.

उन्हामुळे जळाले रोहित्र

ऊन वाढल्याने तापलेल्या रोहित्रात शॉर्ट सक्रीट झाल्याने आग लागली. ही घटना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास महादेवपूरा येथे घडली. यात जवळापास महावितरण कंपनीचे ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी अग्निशामन दलाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळविले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने काम सुरू करत विद्युत पुरवठा सुरळीत केला. दरम्यान परिसरातील चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

जीन परिसरात गांजाचा धूर

शहराच्या मुख्य बाजारपेठेला लागून असलेला मोहता जीन गत तीन वर्षांपासून बंद आहे. रेल्वे रुळालगत असलेल्या या जीनच्या परिसरात गांजा, सिगारेट ओढणाऱ्यांची नेहमी वर्दळ असल्याची माहिती येथील चौकीदारने दिली. दुपारी एक वाजताच्या सुमारास परिसरात आग लागल्याची घटना घडली. दरम्यान काही युवक मंडळी या परिसरातून निघताना आढळून आल्याचे सांगण्यात आले. पाहता पाहता जीन परिसरात असलेले गवत जळून खाक झाले. परिसरात असलेल्या काही पडिक घरांनाही या आगिने आपल्या विळख्यात घेतले. येथे असलेली मोठी कडूलिंबाची झाडेही या आगित होरपळल्या गेली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com